उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती

उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आणि खासदार पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी उमेश पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उमेश पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच सरचिटणीस म्हणून पक्षसंघटनेत काम केले आहे. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ही ते कार्यरत आहे. गत वेळी जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय कार्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या निवडीवरून झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी यापूर्वी मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा दिला होता. या घडामोडींमुळे मोहोळच्या राजकीय वर्तुळात त्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली होती.


चौकट -

माझ्या या नव्या जबाबदारीचे श्रेय मी अजितदादा पवार चरणी अर्पण करतो-


स्वर्गीय अजित पवार आणि पक्षासोबत काम करताना अनेक चढ-उतार पाहिले; पण प्रत्येक कठीण प्रसंगी दादा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांचा विश्वास, मार्गदर्शन आणि दिलेली शिकवण हीच माझी खरी ताकद राहिली आहे. आज दादा आमच्यात नाहीत, ही वेदना कायम मनात राहील. पण त्यांनी दिलेले विचार, मूल्ये आणि जनसेवेचा मार्ग माझ्या प्रत्येक कार्यातून जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आयुष्यभर करत राहीन. दादांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे, हीच त्यांच्या प्रती माझी खरी कृतज्ञता असेल. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी झालेली माझी नियुक्ती मी स्वर्गीय अजित दादा पवार यांना समर्पित करतो.


-उमेश पाटील
नूतन राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages