सोलापूरात शिक्षक मतदारयादीत मोठा घोळ! ११ शिक्षक बोगस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 22, 2026

सोलापूरात शिक्षक मतदारयादीत मोठा घोळ! ११ शिक्षक बोगस

 सोलापूरात शिक्षक मतदारयादीत मोठा घोळ! ११ शिक्षक बोगस




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षक आमदारकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदारयादीत ११ जण शिक्षक नसताना मतदार यादीत असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशावरून त्या सर्वांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली.

त्यावेळी ते अकरा जण शिक्षक नसल्याचे उघड झाले. बार्शीतील गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरूद्ध बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शिक्षक आमदारकीसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. २२ सप्टेंबरला शिक्षक व पदवीधर मतदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. यात ११ मतदार शिक्षक नसतानाही मतदारयादीत असल्याचे वृत्त समाजमाध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या आदेशानुसार झोनल अधिकारी बाजड यांनी संशयितांच्या अर्जांची पडताळणी केली.

अर्जदारांनी पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील एम. जी. गुरुकुल व जोतिबाची वाडी (ता. बार्शी) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक असल्याचे प्रमाणपत्र मतदार नोंदणीवेळी दिले होते. त्या अर्जांवर शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी, शिक्का होता. त्यावरून १७ ऑक्टोबरला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्या सर्वांबद्दल पत्राद्वारे माहिती मागविली.

दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी ते शाळेत शिक्षक नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी तथा झोनल अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. आता त्यांच्या अर्जावरील मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी, शिक्क्यांची तपासणी फॉरेन्सिक लॅब व हस्ताक्षर तज्ज्ञांकडून केली जाणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

'हे' आहेत ११ शिक्षक

जोतिबाची वाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात मोहन बाळासाहेब भोसले (रा. जोतिबाची वाडी), अक्षय श्रीहरी चव्हाण (रा. जवळगाव नं.२, बार्शी), तुषार मोहन भोसले (रा. रूई, ता. बार्शी), तसेच पेहे येथील एम. जी. गुरुकुल प्रशालेत स्वप्निल अंबरूषी कापसे, रोहित बाबासाहेब कापसे, पृथ्वीराज बाळासाहेब कापसे, शुक्राचार्य शाहूराजे बाबर, सुरज युवराज बाबर, सुदेश नवनाथ कापसे, अभिजित बापू डिसले व संतोषी किशोर धेंडे हे शिक्षक नसल्याचे दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रशासनाला कळविले. त्यावरून ११ जणांनी बनावट प्रमाणपत्रे सादर करून शिक्षक मतदार यादीत नावे समाविष्ट केल्याचे सिद्ध झाले. त्यावरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages