शिक्षण क्षेत्रातील रसगंध व्यक्ती दशरथ गोप यांचा सत्कार सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

शिक्षण क्षेत्रातील रसगंध व्यक्ती दशरथ गोप यांचा सत्कार सोहळा

 शिक्षण क्षेत्रातील रसगंध व्यक्ती दशरथ गोप यांचा सत्कार सोहळा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी शिक्षण संस्थेचे गेल्या 33 वर्षापासून सचिव पदाची धुरा सांभाळत आहेत. धाडसी नेतृत्व, अभ्यासू व्यक्ती, उत्कृष्ट मार्गदर्शक, सल्लागार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील वचनबद्ध, रसगंध व्यक्तिमत्व अशा दशरथ गोप यांचा आज जन्मदिवस. दशरथ गोप मित्र परिवाराकडून वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
       पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड्. श्रीनिवास क्यातम यांच्या हस्ते दशरथ गोप यांचा शाल व श्रीफळ  देऊन सपत्नीक गौरव व सत्कार करण्यात आला.  
      या कार्यक्रमा प्रसंगी कन्या प्रशालेचे सहशिक्षक विश्वनाथ काळे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ नारायणराव कुचन प्राथमिक शाळेच्या एका खोलीच्या बांधकामासाठी ७ लाख  देणगी जाहीर करून १ लाख रुपयाचा धनादेश  संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या कडे सुपूर्द केला. 
            यावेळी मधुकर कट्टा गणेश गुज्जा, अरविंद कुचन, नागनाथ गंजी, प्रभाकर आरकाल, मल्लिकार्जुन सरगम, श्रीनिवास जोग, अंबादास गज्जम, दिनेश यन्नम, हरीष कोंडा, प्रा. श्रीनिवास कोंडी, श्रीनिवास इप्पाकायल, रामदास इप्पाकायल, पांडुरंग दिड्डी, श्रीधर चिट्याल, गोवर्धन कमटम, नरेश श्रीराम, विजयकुमार गुल्लापल्ली, दत्तात्रय यन्नम,निलेश सरगम, व्यंकटेश आकेन, श्रीनिवास गड्डम, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंडयाल, डॉ.सुर्यप्रकाश कोठे, नागेश वल्याळ, काशीनाथ गड्डम, शामसुंदर विन्नू, अभंग सर, महेश सरवदे, श्रावण बिराजदार, विद्यानंद स्वामी, वैजनाथ हत्तुरे, श्रीपाद सुरवसे  भालचंद्र म्हेत्रे, संतोष सोमा, श्रीनिवास वासुदेव गड्डम, काळे सर मित्रपरिवार, ओम बहुउद्देशीय संस्था, सौ. इंदिरा कुडक्याल, दत्तात्रय कुंटला, मधुकर गवळी, मेघनाथ येमूल, शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे वरिष्ठ लिपिक नितीन वारे, सोनवणे, नवनीत एजन्सीचे कुलकर्णी, श्रीनिवास कर्रे, राजशेखर गुंडेली, संतोष किल्लेदार, वैकुंठम जडल, शामकुमार बेनगिरी, विष्णू कारमपुरी, डॉ राजेंद्र शेंडगे, राजेश मामड्याल, अंबादास राजूल, संतोष उदगिरी, लक्ष्मीकांत उदगिरी, सत्यनारायण गुर्रम, शंकर चौगुले, विजय चिप्पा, गोपाळ मुडद्दिड्डी, मोहन डांगरे, प्रशांत फत्तेपूरकर, तिरुपती परकीपंडला, लोकमतचे संपादक देसाई, रोहित बिटला, इस्माईल चामाकोरा, नारायण येरवा,  संतोष चन्ना पंतुलु, भास्कर पिठ्ठा, गौतम संगा, ज्ञानेश्वर म्याकल, सिद्धेश्वर तरुण मंडळ, गजानन घोडके, मनोज पिसके, दत्तात्रेय गोटीपामूल, अंजीखाने, गजानन महाराज संस्था सोलापूर, सरस्वती क्लासेस, संजय साळुंखे मुरलीधर मडूर,राजू कोमाकूल, विशाल पल्ली, राजेश नामपेल्ली, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे खोबरे साहेब, अनिल अं पल्ली, अजय कोंकत्ती, दत्तात्रय गुंडला, सुदर्शन कोंपेल्ली, पेंटप्पा गज्जम, अरविंद बोमड्याल, श्रीनिवास गोसकी, अशोक यन्नम, राजेश संगा, अंबादास कैंची, श्रीधर बोल्ली, आत्माराम चिप्पा, लक्ष्मीनारायण गोप, कुसेकर संभारम, अंबादास गुत्तीकोंडा,  सुनिल कोंडा बिल्डर, केतन द्यावनपल्ली, कृष्णाहरी चिलका, शिवराज दासी, अशोक इंदापुरे, गिरीष कोटा पेंटर, श्रीनिवास यल्ला, पत्रकार श्रीनिवास दासरी, वेणुगोपाल गाडी, अनिल गंजी सर, संतोष येमूल,  चंद्रशेखर ईराबत्ती, रमेश केदारी, वासुदेव इप्पलपल्ली, ॲड्. श्रीनिवास कटकूर, श्रीनिवास पेंबर्ती, विवेक कुडक्याल,  सुर्योदय मंडळ, हिरालाल गंजी, चंद्रकांत केदारी, गवई पेठ नवरात्र मंडळ, देवयानी, सुधाकर गुंडेली, वेणुगोपाल जिंदम, प्रसाद फोटो, श्रीनिवास सिध्दम, गोपी आचारी, प्रसाद बंडी, वेणुगोपाल जिल्ला पंतुलू श्रीनिवास कुडक्याल, शेखर कटकम, श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट, अंबादास हिंदी, गणेश पेनगोंडा, बिटला, सदाफुले सर, बालाजी दासरी, सिध्देश्वर कमटम, सुखकर्ता मित्र मंडळ,प्रकाश डांगे संभाजी आरमार तसेच संस्था संचालित सर्व शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इ. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages