'उद्योग महर्षी चषक' राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

'उद्योग महर्षी चषक' राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 'उद्योग महर्षी चषक' राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- उद्योग महर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या 'उद्योग महर्षी चषक' राष्ट्रीय निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचे अकलूज येथे अत्यंत उत्साही व भव्य वातावरणात उद्घाटन संपन्न झाले. अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात उदयसिंह क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यास शिवशंकर मध्यवर्ती सहकारी बझारच्या चेअरमन डॉ. स्वयंंप्रभादेवी मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, देवन्या मोहिते-पाटील, नगरसेवक क्रांतिसिंह माने-पाटील, नगराध्यक्षा रेशमाताई अडगळे यांच्यासह सर्व नगरसेवक आदींची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्पर्धा प्रमुख अनिल जाधव, महेश ढेंबरे, अनिल उघडे, राहुल बोबडे, प्रकाश गायकवाड, शशांक गायकवाड, रोहित पवार यांच्यासह उदयसिंह क्रीडा मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

पहिल्या दिवशी रंगले १६ रोमहर्षक सामने; नागपूर, मुंबई, बंगळुरू, पुणे, अमरावती, नांदेडचे वर्चस्व
उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी विविध संघांमध्ये एकूण १६ चुरशीचे सामने खेळवले गेले. या सामन्यांचे निकाल खालीलप्रमाणे राहिले:
१. एसएनजी नागपूर वि. यूकेएम अकलूज: एसएनजी नागपूर संघाने ३४-२१ अशा गुणांनी विजय मिळवला.
२. बंगळुरू वि. सोलापूर बॉलर्स: बंगळुरूने ८५-४१ अशा मोठ्या फरकाने विजय नोंदवला.
३. जय हिंद कडा, बीड वि. अलाहाबाद युनिव्हर्सिटी, प्रयागराज: जय हिंद कडा (बीड) संघाने ७३-४६ ने विजय मिळवला.
४. नागपूर अचीव्हर्स वि. अमरावती: अमरावतीने अत्यंत चुरशीच्या लढतीत ५८-५६ अशा दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
५. एसकेबीए पुणे वि. ग्रीन स्टार, सोलापूर: एसकेबीए पुणे संघाने ५६-५५ असा एका गुणाने अटीतटीचा विजय मिळवला.
६. नेक्सस स्पोर्ट्स, नांदेड वि. बारामती: नांदेड संघाने ६७-५६ ने बाजी मारली.
७. इंडियन जिमखाना, मुंबई वि. विजयपुरा: इंडियन जिमखाना मुंबईने ४४-२८ ने विजय मिळवला.
८. नेक्सस स्पोर्ट्स, नांदेड वि. सोलापूर बॉलर्स: नांदेड संघाने ५९-१५ असा एकतर्फी विजय मिळवला.
९. नागपाडा, मुंबई वि. बीएसयू बंगळुरू: नागपाडा मुंबई संघाने ८५-६७ ने शानदार विजय मिळवला.
१०. इंडियन जिमखाना, मुंबई वि. ग्रीन स्टार सोलापूर: मुंबईने ५७-५० अशा गुणांनी विजय मिळवला.
११. अलाहाबाद युनिव्हर्सिटी, प्रयागराज वि. नागपूर अचीव्हर्स: नागपूर अचीव्हर्सने ४७-३३ ने बाजी मारली.
१२. एसकेबीए पुणे वि. विजयपुरा: पुणे संघाने ४८-२५ ने विजय नोंदवला.
१३. बंगळुरू वि. बारामती: बंगळुरू संघाने ५९-५३ ने विजय संपादन केला.
१४. बीएसयू बंगळुरू वि. अकलूज: बीएसयू बंगळुरूने ५१-४३ ने विजय मिळवला.
१५. जय हिंद कडा, बीड वि. अमरावती: अमरावतीने ६०-५५ अशा गुणांनी सामना जिंकला.
१६. नागपाडा, मुंबई वि. एसएनजी नागपूर: नागपाडा मुंबई संघाने ६४-५४ ने विजय मिळवला.
आकर्षक बक्षिसे व चषक
२ ते ४ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ₹७१,००१ व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकास ₹५१,००१ व ट्रॉफी, तृतीय क्रमांकास ₹३१,००१ व ट्रॉफी, चतुर्थ क्रमांकास ₹२१,००१ व ट्रॉफी, तसेच उत्कृष्ट खेळाडूसाठी ₹५,००१ रोख व ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना व बक्षीस वितरण समारंभ रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता पार पडणार आहे. क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन उदयसिंह क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages