दिवाळीपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

दिवाळीपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू करा

 दिवाळीपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू करा

शिक्षक संघटनांची शिक्षण आयुक्त व संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे  मागणी




पुणे (कटूसत्य वृत्त):- राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी तात्काळ अदा करा अशी मागणी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती सुनील चव्हाण व मुरलीधर कडलास्कर यांनी दिली. डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले..
, सन २०२५-२०२६ च्या संचमान्यतेनुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, अद्याप समायोजन न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा टॅब (Authorization tab) माहे सप्टेंबर २०२६ पासून अचानक बंद करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील अशा सर्व अतिरिक्त शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन पूर्णपणे रखडले आहे.
सध्या दसरा आणि पाठोपाठ दीपावलीसारखे मोठे सण तोंडावर आले असताना, ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांचे वेतन थांबवणे अत्यंत अनुचित आहे, अशी भावना संघटनांनी व्यक्त केली आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन माननीय शिक्षण आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश द्यावेत आणि अतिरिक्त शिक्षकांचे वेतन सुरू करावे, अशी आग्रही विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही याबाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन संघटनेला दिले.यावेळी प्रकाश बडूरे, शिवराज चौलगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या पत्रावर मुरलीधर कडलास्कर विनोद आगलावे  अ. गफ्फूर अरब आणि आप्पाराव इटेकर  यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages