‘नो डीजे, नो डॉल्बी’ला प्राधान्य; पारंपरिक मिरवणुकीतून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ‘आझादचा राजा’चा गौरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

‘नो डीजे, नो डॉल्बी’ला प्राधान्य; पारंपरिक मिरवणुकीतून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ‘आझादचा राजा’चा गौरव

 ‘नो डीजे, नो डॉल्बी’ला प्राधान्य; पारंपरिक मिरवणुकीतून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ‘आझादचा राजा’चा गौरव




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील तब्बल ९२ वर्षांची परंपरा असलेल्या व पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आझादचा राजा’ गणेशोत्सव तरुण मंडळाचा सोलापूर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला. सन २०२६ चा गणेशोत्सव नो डीजे, नो डॉल्बी, शांततापूर्ण, पारंपरिक व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केल्याबद्दल मंडळाला प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह (ट्रॉफी) प्रदान करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने यंदाचा गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले होते. सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ‘आझादचा राजा’ मंडळाने अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे व डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा वापर केला.मंडळाच्या वतीने मिरवणुकीत मानाची ज्योतिबा व मानाची काठी यांचा धार्मिक व पारंपरिक देखावा सादर करण्यात आला. या देखाव्याने तसेच शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मिरवणुकीने उपस्थित भाविकांची मने जिंकली. गणेशोत्सवात धार्मिक परंपरा, सामाजिक सलोखा आणि पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्याबद्दल मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.सोलापूर जिल्हा पोलिस कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे, अपर पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण विजय कबाडे तसेच नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या हस्ते ‘आझादचा राजा’ गणेशोत्सव तरुण मंडळाला प्रशस्तीपत्र व ट्रॉफी प्रदान करण्णयात आली.यावेळी मंडळाच्या वतीने मार्गदर्शक शक्तीभैय्या पलंगे, सागर इंगोले, संजय पलंगे, उपाध्यक्ष अक्षय पलंगे, तसेच कार्तिक पलंगे, रविंद्र कोतमिरे आदी उपस्थित होते.
‘आझादचा राजा’ गणेशोत्सव तरुण मंडळाकडून दरवर्षी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपाचे विविध उपक्रम राबविले जातात. यंदा पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून पोलिस प्रशासनाला दिलेल्या सहकार्याबद्दल मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages