मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा

 मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्याचा आढावा





बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणी व चारा टंचाई तसेच विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बार्शी पंचायत समितीला भेट देऊन सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमाचे  तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

पंचायत समिती येथे झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाई, चारा उपलब्धता, जलजीवन मिशनची सुरू असलेली व पूर्ण झालेली कामे याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. नागरिकांना टंचाईच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सर्व विभागप्रमुख, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी ग्रामसेवकांकडून टंचाई परिस्थितीसह घरकुल व समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून अभियान प्रभावीपणे व पूर्ण क्षमतेने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यानंतर उपळाई ठोंगे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करून पुढील तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.
उपळाई ठोंगे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन जिल्ह्यातील उत्कृष्ट परसबागेची पाहणी करण्यात आली. शाळेतील उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पोषण व शैक्षणिक विकासासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच महिला बचतगटाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून बचतगटांना मंजूर झालेली कर्जे, सुरू असलेले उद्योग व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. ग्रामीण महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून उद्योगांना चालना देण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

दरम्यान, नुकत्याच सुरू झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन कामकाजाची पाहणी करण्यात आली. पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने पशुपालकांना वेळेवर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासही भेट देऊन इमारत व आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. नागरिकांना अधिक चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी ओपीडीची संख्या वाढविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.
या दौऱ्यादरम्यान प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, सभापती मीनाक्षी रोंगे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांच्यासह तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages