नवरात्रोत्सवातील मिरवणुकांसाठी पोलिस बंदोबस्त वाढवा, सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र मंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 15, 2026

नवरात्रोत्सवातील मिरवणुकांसाठी पोलिस बंदोबस्त वाढवा, सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र मंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

 नवरात्रोत्सवातील मिरवणुकांसाठी पोलिस बंदोबस्त वाढवा, सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र मंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील देवी विसर्जन मिरवणुकांसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, तसेच विजया दशमीच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीस परवानगी द्यावी, अशी मागणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तीपूजा मंडळाच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होत आहे. घटस्थापनेच्या दिवशी विविध मंडळांकडून देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विजयादशमीला विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुका मंगळवार पेठ पोलीस चौकी, क्रांती चौक, सराफ बाजार, मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा, सिद्धेश्वर प्रशाला, श्री सिद्धेश्वर मंदिर मार्ग आणि पार्क चौक परिसरातून जातात.
मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील अडचणी दूर करून मंडळांना सहकार्य करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र मंडळ ट्रस्ट प्रमुख दिलिप कोल्हे, मल्लिनाथ मसरे, सुरेश पाटील, दत्तात्रय मैनकुदळे, बाबुराव जमादार, ब्रम्हदेव गायकवाड, लताताई फुटाणे, शेखर फंड, दिनेश जाधव, बाबा शेख, निलेश शिंदे, आशिप उपाध्ये,
आदी पदाधिकारी उपस्थित होते. विजयादशमीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देऊन आवश्यक बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages