क्षयरोग निर्मूलनासाठी जोश उपक्रमाची उत्साहात सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 15, 2026

क्षयरोग निर्मूलनासाठी जोश उपक्रमाची उत्साहात सुरुवात

 क्षयरोग निर्मूलनासाठी जोश उपक्रमाची उत्साहात सुरुवात





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- टीबी मुक्त भारत अभियानाला गती देण्यासाठी आणि क्षयरोग निर्मूलनात  जनभागीदारी व युवाशक्तीच्या सक्रिय सहभागातून राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिके तर्फे शहरात *जोश उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
         JOSH(Joint Squad For Health Teams)टीबी निर्मूलनासाठी युवक आहेत तयार असा प्रेरक नारा यावेळी देण्यात आला. या जोश टीममध्ये एनएसएस, एनसीसी, माय भारत स्वयंसेवकांचा समावेश आहे. क्षयरोग निर्मूलनामध्ये स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सार्वजनिक ठिकाणी रॅली ,पोस्टर प्रदर्शन, पथनाट्याद्वारे सामाजिक प्रबोधन ,सोशल मीडियाचा वापर करून टीबी जनजागृतीचे संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे आणि टीबी मुक्त भारत ॲपचा प्रभावीपणे वापर करणे,निक्षय मित्र बनविणे,फुड बास्केट वाटप,आयुष्यमान आरोग्य शिबिरामध्ये सहकार्य करणे याबरोबरच स्वच्छता, नशामुक्तीचे संदेश देणे इत्यादी बाबींची शहर ‌क्षयरोग केंद्राद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.* या क्षयमुक्तीच्या जनआंदोलनात शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन  आयुक्त डॉ.सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, आरोग्याधिकारी डॉ.राखी माने, शहर ‌क्षयरोग अधिकारी डॉ.प्रसाद कुमार यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages