प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

 प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार





सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांचा सन २०१८-१९ या वर्षाचा आयकर परतावा बराच काळ प्रलंबित होता. आयकर विभागाने या प्रकरणी तत्पर व सकारात्मक कार्यवाही केल्यामुळे कंपनीला व्याजासह एकूण रु.1.29 कोटी इतका परतावा प्राप्त झाला आहे. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम २४४ए अंतर्गत देय असलेल्या ₹६३,४३,२४५ इतक्या व्याजाचा समावेश आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अपर आयकर आयुक्त (रेंज-१, सोलापूर) वैभव म. ढेरे (भा.रा.से.), आयकर उपायुक्त (सर्कल-१, सोलापूर) सुभाष वि. पाटील आणि आयकर निरीक्षक (सर्कल-१) श्रीकांत एल. यांचा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज महापालिका आयुक्त कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अंतर्गत लेखापरिक्षक राहुल कुलकर्णी आणि मनोज नंदीमठ उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. ओंबासे म्हणाले की, वैभव ढेरे यांचे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन या प्रकरणात मोलाचे ठरले. पुणे येथील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सुभाष पाटील यांनी सोलापूर भेटींदरम्यान या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला, तर श्रीकांत एल. यांनी आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण केली. सर्वांच्या सहकार्यामुळेच हा परतावा सुरळीतपणे प्राप्त होऊ शकला.
“हा परतावा म्हणजे जनतेचा पैसा असून तो शहराच्या विकासकामांसाठी योग्य प्रकारे वापरला जाईल,” असे सांगून डॉ. ओंबासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयकर विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages