अकलूज येथील कॉलेज ऑफ फार्मसी 'जेनेसिस २०२६' चा जल्लोष ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

अकलूज येथील कॉलेज ऑफ फार्मसी 'जेनेसिस २०२६' चा जल्लोष !

 अकलूज येथील कॉलेज ऑफ फार्मसी 'जेनेसिस २०२६' चा जल्लोष !



अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) येथे 'जेनेसिस २०२६' म्हणजेच फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.हा स्वागत समारंभ डी.फार्मासीच्या  प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वातावरणात समाविष्ट करून घेण्यासाठी खूप महत्वाचा टप्पा आहे तसेच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एक दुवा होता.
         या कार्यक्रमाचे उदघाट्क शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक विनोदकुमार दोशी यांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलित करण्यात आले.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नारायण फुले,संचालक रामचंद्र गायकवाड,कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी)चे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे,प्राचार्य नानासाहेब देवडकर उपस्थित होते.
         कार्यक्रमात प्रथम वर्षातील मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले,नृत्य गायन यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शित केले,मनोरंजासाठी फनी गेमसारख्या ऍक्टिव्हिटी हि विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. डॉ.अनिल भानवसे यांनी मुलांना मोलाचे मार्दर्शन केले व त्यांच्या कलागुणांचे कौतुकही केले तसेच मुलांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता झाली.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व व्दितीय वर्षीतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages