ऊसदर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड करू नये! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

ऊसदर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड करू नये!

ऊसदर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड करू नये!
तांदुळवाडीत शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन




दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे ऊसदर निश्चित करून जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी ऊसतोड सुरू करू नये, या प्रमुख मागणीसाठी तांदुळवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि ऊसदर निश्चित करण्याबाबत साखर कारखानदारांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांचे ऊसदर निश्चित होण्यापूर्वी ऊसतोड सुरू केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने, प्रथम शेतकऱ्यांचे ऊसदर जाहीर करावा आणि त्यानंतरच ऊसतोड सुरू करावी, अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी मांडली.
यावेळी मा. सभापती भिमाशंकर जमादार,मा. सरपंच सिद्धाराम हेले, कैलास मेरू आणि अशोक कस्तुरे यांनी मनोगत व्यक्त केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक असून, ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या आंदोलनावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मुस्तीचे सरपंच बालाजी जमादार, उपसरपंच हरीश शिंदे,लिंगराज पाटील ,रविकिरण मेहता, अशोक लांडे, संजय स्वामी, प्रितीश हेले, अप्पू कळके, देवराज बिराजदार, राहुल मोरडे, चंद्रकांत बिडवे, संगप्पा कराळे, लक्ष्मण वायचळे, संदीप कराळे, कल्याणी भडंगे, पंडित लुत्ते, मारुती बिराजदार आणि सैपन तांबोळी यांच्यासह अन्य ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संबंधित साखर कारखानदारांनी गांभीर्याने लक्ष देऊन  ऊसदर निश्चित करावा, तो जाहीर करावा आणि त्यानंतरच ऊसतोड सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages