एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी रिपाइंचे निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 8, 2026

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी रिपाइंचे निवेदन

 एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी रिपाइंचे निवेदन

परीक्षा गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून रिक्त पदांची भरती तातडीने करण्याची मागणी



श्रीपूर (कटूसत्य वृत्त):- पुणे येथे एमपीएससी परीक्षेतील विविध प्रश्नांवरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), माळशिरस तालुक्याच्या वतीने राज्य सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन साद करण्यात आले. रिपाइंचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज येथील प्रांत अधिकारी कार्यालयात हे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार रत्नाकर कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.

एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकार, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, रिक्त पदांची भरती तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून यापूर्वी झालेल्या परीक्षांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली.

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत योग्य निर्णय घेऊन स्वच्छ प्रतिमा आणि सक्षम व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासकीय विभागांमधील ७० हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण करावी आणि स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.

यावेळी रिपाइंचे युवक राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, पश्चिम महाराष्ट्र संघटक एस. एम. गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र सदस्य युवराज वाघमारे, धनाजी पवार, उपाध्यक्ष शामराव भोसले, रमेश धाईंजे, तुकाराम बाबर, पोपट गेजगे, भास्कर बनसोडे, अण्णासाहेब भोसले, प्रवीण साळवे, प्रकाश गायकवाड, संतोष कांबळे, सचिन गायकवाड, रविराज बनसोडे, शरद साबळे, महेंद्र धांडोरे, गणेश सावंत, अतिश आठवले, राजेंद्र जाधव, गणेश साठे, संतोष जाधव, प्रेम कांबळे, गौतम आठवले, मंगेश भोसले, राम बनसोडे यांच्यासह रिपाइंचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages