सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची शेतकरी बांधवांशी सकारात्मक चर्चा; ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेले उपोषण मागे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 8, 2026

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची शेतकरी बांधवांशी सकारात्मक चर्चा; ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेले उपोषण मागे

 

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची शेतकरी बांधवांशी सकारात्मक चर्चा; ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेले उपोषण मागे




मुंबई(कटूसत्य वृत्त):- ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ वितरण सुरू आहे. लाभ घेताना आधार प्रमाणीकरणामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकरी बांधवांनी आपले उपोषण मागे घेतले.

राष्ट्रीय मराठा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळकर यांच्यासह शेतकरी बांधवांनी विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे ५ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपोषणकर्त्या शेतकरी बांधवांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे वाढते वय, शेतीच्या कामामुळे बोटांचे ठसे झिजणे आदी कारणांमुळे काही पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आधार प्रमाणीकरणातील तांत्रिक अडचणीं विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या  समितीसमोर या तंत्रिका अडचणी मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असे सांगून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी बांधवांच्या मागण्या संवेदनशीलतेने ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यानंतर अंकुशराव पाटील होनाळकर यांनी आझाद मैदान येथे ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages