राज्य शिवाचार्य महासभेच्या अध्यक्षपदी नंदिकेश्वर शिवाचार्यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 8, 2026

राज्य शिवाचार्य महासभेच्या अध्यक्षपदी नंदिकेश्वर शिवाचार्यांची निवड

 राज्य शिवाचार्य महासभेच्या  अध्यक्षपदी नंदिकेश्वर शिवाचार्यांची निवड




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान कपिलधार मांजरसुंबा येथे आयोजित वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभेत राज्य अध्यक्षपदी श्री. ष. ब्र. १०८ तपोरत्नं नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी सोनपेठकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष  श्री. ष. ब्र. १०८ श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर(सोलापूर )यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील शिवाचार्यांची बैठक झाली.यावेळी नूतन कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीत वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभेच्या राज्य अध्यक्षपदी श्री. ष. ब्र. १०८ तपोरत्नं नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी( सोनपेठ) यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी श्री. ष. ब्र. १०८ शिवाचार्य रत्न डॉ शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजी (उदगीर) तर उपाध्यक्षपदी श्री. ष. ब्र. १०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य महास्वामीजी (गिरगाव) व सचिवपदी श्री ष ब्र १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी (मुखेड) व तसेच कोषाध्यक्षपदी श्री. ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य महास्वामीजी (वाई)  आणि प्रवक्ते म्हणून श्री. ष. ब्र. १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी (जिंतूर) व तसेच श्री. ष. ब्र. १०८ दिगंबर शिवाचार्य महास्वामीजी (वसमत) आदींची निवड करण्यात आली.यावेळी महाराष्ट्रातील बहुसंख्य शिवाचार्यगण उपस्थित होते. यावेळी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी आशीर्वचनात म्हणाले,वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व मठ मंदिर संस्थानांचे जतन करणे, धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण करणे ,शास्त्र चिंतन व प्रवचनाचे आयोजन करणे, विविध मठावर मठाधिपतीची नियुक्ती करणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, समाज प्रबोधन करणे, आपत्ती प्रसंगी मदत करणे आदी उद्देशाने तसेच वीरशैव लिंगायत संप्रदाय वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.यावेळी नागणसूर महास्वामीजी यांच्या हस्ते राज्य नव नियुक्त कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे गौरव करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages