संवेदनशील कुशल अभियंता अशी प्रतिमा तयार करा - डॉ. हरीश तिवारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

संवेदनशील कुशल अभियंता अशी प्रतिमा तयार करा - डॉ. हरीश तिवारी

 संवेदनशील कुशल अभियंता अशी प्रतिमा तयार करा - डॉ. हरीश तिवारी 

पीसीसीओईआरमध्ये प्रथम वर्ष प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ 





पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):-  अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साध्य करीत असताना समाजामध्ये जबाबदार, संवेदनशील आणि कुशल अभियंता अशी आपली प्रतिमा तयार करावी. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नव कल्पना आणि उद्योग संपर्क यांच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे असे मार्गदर्शन पीसीसीओईआर चे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी केले.  
     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे मेकॅनिकल, सिव्हिल, इ अँड टीसी आणि आयटी या विभागांच्या प्रथम वर्ष बी. टेक. मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ समारंभात डॉ. तिवारी बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे असोसिएट डीन डॉ. राहुल मापारी, पीसीईटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीन डॉ. शितलकुमार रवंदळे, विभाग प्रमुख प्रा. शीतल पाटील, इंडक्शन प्रोग्राम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, पालक प्रतिनिधी अशोक अरळी, विविध विभागाचे प्रमुख प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
   डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, नैतिक मूल्य, सातत्य याचे आचरण करून ज्ञानार्जन, नवकल्पना, तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करीत करिअर घडवावे. सध्या तंत्रज्ञान विकासाचा आणि बदलाचा वेग लक्षणीय आहे, त्यामुळे सर्वच उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या अभियंत्यांकडून अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपलब्ध करिअर संधींचा लाभ घ्यावा. 
  पालक प्रतिनिधी अशोक अरळी यांनी येथील शैक्षणिक उपक्रमांचे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे आणि करिअर साठी उपलब्ध विविध संधींचे कौतुक केले.
    मेकॅनिकल, सिविल, इ अँड टीसी आणि आयटी या शाखांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
      पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    स्वागत प्रा. प्रिया ओघे, सूत्रसंचालन प्रा. शीतल पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages