आढेगाव-टाकळी रस्त्याचे काम अखेर सुरूसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या आदेशानंतर ठेकेदाराकडून कामाला सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

आढेगाव-टाकळी रस्त्याचे काम अखेर सुरूसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या आदेशानंतर ठेकेदाराकडून कामाला सुरुवात

 आढेगाव-टाकळी रस्त्याचे काम अखेर सुरूसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या आदेशानंतर ठेकेदाराकडून कामाला सुरुवात




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  माढा तालुक्यातील मौजे आढेगाव पाटी ते टाकळी (टें.)-गारअकोले या प्रजिमा १२८ रस्त्याचे अडीच वर्षांपासून रखडलेले काम अखेर सुरू झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर ठेकेदाराने रविवारपासून कामाला सुरुवात केली असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद कृषी सभापती संजय पाटील-भीमानगरकर यांनी दिली.
या रस्त्यासाठी सन २०२३ मध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून रस्ता व चांदज पुलासाठी ३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. ७ मार्च २०२४ रोजी कामाची वर्कऑर्डरही देण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराकडून प्रत्यक्ष काम सुरू झाले नव्हते.
या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद कृषी सभापती संजय पाटील-भीमानगरकर यांनी ६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर मंत्र्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अधीक्षक अभियंता कुंभार यांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर अधीक्षक अभियंता कुंभार आणि कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी कोंढार भागातील सरपंच व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन ठेकेदाराला काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संपूर्ण काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे संजय पाटील-भीमानगरकर यांनी सांगितले.
रस्त्याचे काम सुरू झाल्याने कोंढार भागातील शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा परिसरातील प्रमुख वाहतूक मार्ग असल्याने आढेगाव पाटीपासून रस्ता साडेपाच मीटर रुंदीचा करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील सरपंच व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
ही मागणी आढेगावचे माजी उपसभापती धनाजी जवळगे, टाकळीचे सरपंच, वडोलीचे सरपंच तानाजी सलगर, सरपंच तानाजी गाडे-पाटील आणि चांदजचे सरपंच रामचंद्र टकले यांनी केली आहे.
दरम्यान, काम सुरू झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद कृषी सभापती संजय पाटील-भीमानगरकर यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. काम दर्जेदार व नियमानुसार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. तसेच ग्रामस्थांनीही कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages