यथोचित सन्मान अन् सांस्कृतिक मेजवानीसह रंगला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आनंदोत्सव सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

यथोचित सन्मान अन् सांस्कृतिक मेजवानीसह रंगला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आनंदोत्सव सोहळा

 यथोचित सन्मान अन् सांस्कृतिक मेजवानीसह रंगला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आनंदोत्सव सोहळा




सोलापूर(कटूसत्य वृत्त):- भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत 'सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र' (CSSC- मुंबई), प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (RRTC), सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघटनांची शिखर समिती आणि आदर्श ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सोलापुरात भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या अध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार्क चौकातील निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.  कार्यक्रमाचे उद्घाटन समाजकल्याण खात्याचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव शिंदे, डॉ. प्रा. मनोहर चव्हाण, महादेव माने, गुरुलिंग कन्नूरकर, विलास मोरे, मन्मथ कोनापुरे, विजयकुमार भोसले, चन्नया स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आरआरटीसीच्या प्रमुख कार्यवाहक तथा मुंबईच्या माजी महापौर सौ. निर्मलाताई सामंत-प्रभावळकर उपस्थित होत्या.
या आनंदोत्सवात विविध प्रांतांची समृद्ध लोकपरंपरा व संस्कृती दर्शवणारे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये
पारंपरिक सादरीकरणे.. विशेषतः भरतनाट्यम, मंगळागौर, दक्षिण भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा 'बतुकम्मा' उत्सव आणि ज्येष्ठ महिलांचे लेझीम नृत्य खास आकर्षण ठरले.
एकपात्री लघुनाट्य, नाट्यप्रहसन (स्कीट), गझल आणि गीत-संगीताच्या मैफिलीने कार्यक्रमात रंगत भरली.
प्रकल्प अधिकारी नीलिमा येतकर, पूजा शेरे,
मानसी देसाई, शिल्पा साळवी, आरआरटीसी ग्रुपने उपस्थितांसाठी मनोरंजनात्मक प्रश्नमंजूषा (क्विझ) स्पर्धा घेत आगळी वेगळी मौज आणली.
उत्साहपूर्ण आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी नटलेल्या या सोहळ्याला ज्येष्ठांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी   सोलापुरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनांचे तथा अध्यक्षांचे बहुमोल सहकार्य लाभले.
आदर्श ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे संजय जोगीपेटकर यांच्या आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages