तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई

 तायक्वांदो स्पर्धेत नेताजी प्रशालेची पाच पदकांची कमाई




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील निलम नगर भागातील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेने शहरस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्ण व तीन कांस्य अशी एकूण पाच पदके पटकावली.
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर व तायक्वांदो असोसिएशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी मिळवलेले यश पुढीलप्रमाणे-हर्षिता करेमोलू-१४ वर्षे वयोगट, मुलींचा ३२ किलो वजन गट(सुवर्णपदक),श्रेया करेमोलू–२३ किलो वजन गट(सुवर्णपदक)साईका बुधराम – १७ वर्षे वयोगट, ६० किलो वजन गट– (कांस्यपदक) लक्ष्मी म्हेत्रे –३५ किलो वजन गट (कांस्यपदक),अंबादास दोंतूल –१४ वर्षे वयोगट, मुलांचा ३४ किलो वजन गट (कांस्यपदक) या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक विठ्ठल कुंभार व अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे तसेच सर्व शिक्षकवृंदाने विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages