जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची वसुंधरा पायी दिंडी सोलापूरात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची वसुंधरा पायी दिंडी सोलापूरात

जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची वसुंधरा पायी दिंडी सोलापूरात

५ व ८ ऑक्टोबरला शहरातून दिंडी; भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी (दक्षिणपीठ नाणिजधाम) यांच्यावसुंधरा पायी दिंडीचे सोलापूर शहरात आगमन होत असून, ५ ऑक्टोबर व ८ ऑक्टोबर रोजी या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामानंद संप्रदाय उत्तर सोलापूर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जगदुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे २९ ऑक्टोबर २०२६ रोजी जन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपपीठ येथून वसुंधरा पायी दिंडी काढण्यात येत आहे. ५ ऑक्टोबर रोजी ही दिंडी सोलापूर येथे दाखल होणार असून, त्यादिवशी संध्याकाळी लक्ष्मीनारायण गार्डन, शिवाजी नगर, वाळे चौक येथे श्रींच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी श्रींचे पादुका दर्शन घेऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी वसुंधरा पायी दिंडी वारुधार येथे मुक्कामी राहणार असून, ८ ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरात तिचे आगमन होणार आहे. या दिवशीही संध्याकाळी लक्ष्मीनारायण गार्डन, शिवाजी नगर, वाळे चौक येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे. भाविकांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे समितीने म्हटले आहे.

जगदुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने देशातील विविध राज्यांतून आणि त्यांच्या उपपीठातून वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. 'जागोजागी वृक्षरोपण, मुक्कामी वृक्षारोपण' करत ही दिंडी निघाली आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच आध्यात्मिक व

सामाजिक जनजागृतीचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून दिला जात आहे.

'आपण या जनहितार्थ सेवाभावी कार्यामध्ये सर्वजण सहभागी होऊन किमान ५ किलोमीटर अंतर चालून आपला सहभाग नोंदवावा', असे आवाहनही रामानंद संप्रदाय उत्तर सोलापूर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages