मच्छिमार कुटुंबांच्या हितासाठी संस्थांचे कामकाज सक्षम करा – मंत्री नितेश राणे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

मच्छिमार कुटुंबांच्या हितासाठी संस्थांचे कामकाज सक्षम करा – मंत्री नितेश राणे

 

मच्छिमार कुटुंबांच्या हितासाठी संस्थांचे कामकाज सक्षम करा – मंत्री नितेश राणे





मुंबई(कटूसत्य वृत्त):- नाशिक जिल्हा मच्छिमार व कृषी सहकारी संघ लि. नाशिक यांच्यावरील अंतरिम अवसायनास स्थगिती देऊन जिल्ह्यातील सुमारे २ हजार मच्छिमार कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात नाशिक जिल्हा मच्छिमार व कृषी सहकारी संघ लि., नाशिक अंतरीम अवसायनास स्थगिती देऊन २००० मच्छिमार कुटुंबांना न्याय देण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, संस्थेचे कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. मच्छिमार संस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट मिळावा आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. संस्थेच्या दैनंदिन कामकाजासह उत्पादन, साठा, आर्थिक व्यवहार आणि इतर आवश्यक नोंदी अद्ययावत ठेवून संबंधित कागदपत्रे शासनाकडे वेळेत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

संस्थेच्या कामकाजात प्रकरणांची वस्तुनिष्ठ चौकशी करून नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. मच्छिमार संस्थांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजना, निधी आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल. संस्थांनी प्रशासकीय नोंदी व आर्थिक व्यवहार पारदर्शक आणि अद्ययावत ठेवावेत, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages