उजनीच्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होणार चारा लागवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 15, 2026

उजनीच्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होणार चारा लागवड

 उजनीच्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होणार चारा लागवड

चाऱ्यासाठी अनुदान मिळणार की छावण्या?




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दुष्काळी परिस्थितीत पुढील काही महिने पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी सिंचन भागात आणि विशेषकरून उजनी धरणाच्या बॅकवॉटर भागात शेती असलेल्या शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी बियाणे वाटप करण्यात येणार आहे. त्यातून जिल्ह्याला आणि किंबहुना राज्यासाठीही चारा देण्यात येईल.

साधारण तीन कोटी रुपयांचे बियाणे सहा ते सात हजार लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कार्यरत असून, जलसंधारणाच्या कामावर विशेष भर देण्यात येणार आहे. याबाबत बोलताना कुशल जैन म्हणाले की, शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेला डीपीसीतून (जिल्हा वार्षिक योजना) मिळणारा निधी जलसंधारणाच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच 'जी रामजी' योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी व इतर कामे करता येणार आहेत.

पशुधन वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून, सध्या सुरुवातीला चाऱ्यासाठी बियाणे वाटप केले जात आहे. यापूर्वी जून महिन्यात दोन कोटी रुपयांतून जवळपास ४ हजार २०० शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले होते. आता पुन्हा तीन कोटी रुपयांचे बियाणे वाटण्यात येणार असून, याद्वारे मोठ्या प्रमाणावर चारा निर्मिती होईल.

चाऱ्यासाठी डीबीटी की छावण्या? शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी थेट डीबीटीद्वारे (थेट लाभ हस्तांतरण) अनुदान देण्याची मागणी होत असून, याबाबत शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. चारा खरेदीसाठी अनुदान दिल्यास चारा उपलब्ध आहे, असे सिद्ध होते; पण चाराच नसेल तर अनुदान देऊन काय उपयोग होणार आहे?, असा सवाल काही लोकांकडून उपस्थित केला जात असल्याचे कुशल जैन यांनी सांगितले. मात्र, डीबीटी द्यायची की चारा छावण्या सुरू करायच्या, याबाबतचा अंतिम निर्णय शासनस्तरावर घेतला जाणार आहे.

गावातून मागणी आल्यास ४८ तासांत टँकर सध्या जिल्ह्यातील १२३ टँकरांद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, त्याशिवाय आणखी २४ गावे आणि १८ वाड्या-वस्त्यांतून पाण्याची मागणी आलेली आहे. गावातून मागणी आल्यानंतर ४८ तासांमध्ये प्रत्यक्ष गावात जाऊन तपासणी करून अहवाल देणे बंधनकारक आहे. गावाला खरोखरच टँकरची गरज असल्यास तो तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages