अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम अदा करा- महापौर कोंड्याल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम अदा करा- महापौर कोंड्याल

अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम अदा करा- महापौर कोंड्याल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम प्रतीक्षा यादीप्रमाणे अदा करण्याची कार्यवाही करा, असे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात 900 रुपयांची वाढ करून 4500 देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल कामगार संघटनांनी महापौर विनायक कोंड्याल यांचे आभार मानले. या निर्णयामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे निर्माण झाले आहे.
          महापौर कोंड्याल यांनी बुधवारी सायंकाळी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजीताताई चाकोते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्यासह कामगार नेते अशोक जानराव, शेषराव शिरसाट आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. विविध कामगार संघटनांनीही अनुदानवाढीसाठी निवेदने दिली होती. या मागण्यांचा विचार करून सानुग्रह अनुदानात वाढ करण्याचा निर्णय महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला. सानुग्रह अनुदान ४५०० रुपये आणि सणासाठी दिले जाणारे १२ हजार ५०० रुपयांचे अग्रिम (सन ऍडव्हान्स) मात्र कायम ठेवण्यात आले आहे.
           दिवाळी ५ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने २ नोव्हेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन, अनुदान आणि अग्रिम जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले. यासाठी शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून देयकांची तपासणी करावी, असे निर्देश दिले आहेत. मार्च २०२६ मधील प्रतीक्षा यादीप्रमाणे अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
           महापालिका कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष कामगार नेते अशोक जानराव, शेषराव शिरसाट यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांचे आभार मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages