जिल्हा रुग्णालयात 23 बालकांवर मोफत शस्रक्रिया - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 16, 2026

जिल्हा रुग्णालयात 23 बालकांवर मोफत शस्रक्रिया

 जिल्हा रुग्णालयात 23 बालकांवर मोफत शस्रक्रिया




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आयु‌ष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू रुग्णाना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा रुग्णालयात एकूण 18 बालकांवर मोफत शस्रक्रिया करण्यात आल्या.
सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांसाठी मोफत शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या बालकांवर आवश्यक शस्रक्रिया करण्यात आल्या.
या शिबिरामध्ये हर्नियाच्या 2, हायड्रोसीलच्या 2, टंग टायच्या 12, तसेच हाताच्या मनगटाजवळील सिस्टच्या 1, आणि उजव्या डोळ्यावरील सिस्टच्या 1, अशा एकूण 18 शस्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना आरोग्यविषयक उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ उपलब्ध होत असून, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील उपचाराचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होत आहे. बालकांना वेळेवर निदान व योग्य उपचार मिळावेत, तसेच त्यांचे आरोग्य सुधारावे, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांनी आपल्या पात्रतेनुसार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages