कल्याणशेट्टी महाविद्यालयात रेड रिबन क्लब ची स्थापना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 23, 2026

कल्याणशेट्टी महाविद्यालयात रेड रिबन क्लब ची स्थापना

कल्याणशेट्टी महाविद्यालयात रेड रिबन क्लब ची स्थापना






अक्कलकोट  (कटूसत्य वृत्त):-   कल्याणशेट्टी महाविद्यालयामध्ये एच आय व्ही तथा एड्स  विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, सुरक्षित व आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने रेड रिबीन क्लब ची स्थापना करण्यात आली. 

महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  रेड रिबन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य स्पर्धा, रॅली, पथनाट्य, प्रश्नमंजुषा अशा विविध उपक्रमाद्वारे एडस् जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

 मारुती धर्मसाले म्हणाले की, महाविद्यालयीन स्तरावर रेड रिबन क्लब हा ‘युवकांच्या माध्यमातून समाजजागृती’ घडवून आणणारा प्रभावी उपक्रम आहे. 

राघवेंद्र करजगीकर म्हणाले की, एड्स प्रतिबंधाबरोबरच आरोग्य, सुरक्षितता, समानता आणि सामाजिक संवेदनशीलता यांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास रेड रिबन क्लब महत्त्वाची भूमिका बजावतो.

संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, पुनम कोकळगी, रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी उपक्रमाबद्दल कौतुक केले आहे.

चौकट-

रेड रिबीन क्लब पदाधिकारी  जनजागृती करणार

राष्ट्रीय सेवा योजना  विभागातील स्वयंसेवकाची  रेड रिबीन क्लब चे पदाधिकारी म्हणून  निवड करण्यात आली आहे ते एच आय व्ही संसर्ग व एड्स सारख्या भयानक रोगाबद्दल शहरात देखील जनजागृती करणार आहेत असे प्रतिपादन कार्यक्रम अधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages