विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट येथे विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही १४ व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून बौद्धिक व सामाजिक प्रबोधनाचा उद्देश असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा विवेकानंद प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर यांनी पत्रकार परिषदेत व्याख्यानमालेची माहिती दिली. यावेळी विवेकानंद प्रतिष्ठानचे सदस्य मल्लिकार्जुन मसुती सर, अशोक येणगुरे, मनोज कल्याणशेट्टी, संतोष जिरोळे, गुरुपादप्पा आळगी तसेच व्यवस्थापक चंद्रकांत दसले आदी उपस्थित होते.
व्याख्यानमालेतील कार्यक्रम
29 सप्टेंबर 2026 :
तुफान विनोदी नाटक ‘शिक्कामोर्तब’ प्रमुख कलाकार कांचन पगारे, कृतिका तुळसकर, स्नेहा पराडकर आणि सागर कारंडे
30 सप्टेंबर 2026 : ‘मेर्मबंधातली ठेव’
भावगीते, भक्तिगीते व चित्रपटगीते सादरकर्ते प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन
1 ऑक्टोबर 2026 : सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांचा ‘जाऊ कवितांच्या गावा’
2 ऑक्टोबर 2026 : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्याशी ‘मेळघाटातील आरोग्यदूत’ या विषयावर माधव देशपांडे संवाद साधणार.
3 ऑक्टोबर 2026 : अमृतवक्ता मा.स्वानंद बेदरकर यांचा ‘वंद्य वंदे मातरम्’
4 ऑक्टोबर 2026 : ‘म्हणून स्वातंत्र्यवीर’ या कार्यक्रमात लेखक नितीन वाघ, प्रमुख कलाकार प्रसन्न केतकर व संच सहभागी होणार आहेत.
ही व्याख्यानमाला उत्साहात पार पडणार असून, रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment