नगरसेवक मोहसीन शेख यांच्या संकल्पनेतून नागरिक सुविधा विशेष अभियानाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 23, 2026

नगरसेवक मोहसीन शेख यांच्या संकल्पनेतून नागरिक सुविधा विशेष अभियानाचे आयोजन

नगरसेवक मोहसीन शेख यांच्या संकल्पनेतून नागरिक सुविधा विशेष अभियानाचे आयोजन


अकलूज (कटूसत्य वृत्त):-   अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक मोहसीन शेख यांच्या संकल्पनेतून नागरिक सुविधा विशेष अभियानाचे आयोजन, सहायता वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने, रविवार दिनांक 27.09.2026 रोजी, सकाळी 10 वा. ते दुपारी 3 वा. पर्यंत करण्यात आले असल्याची माहिती अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक मोहसीन शेख यांनी दिली.
       सदरचे अभियान अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई लालासाहेब अडगळे व गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,तर
प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक
मोहसिन शेख व नगरसेविका मंदाकिनी पाडोळे यांच्या
नेतृत्वाखाली होणार असून,
१८ वर्षांवरील युवक व नागरिकांसाठी विशेष सुविधा सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक मोहसीन शेख यांनी केले आहे.
          सदरच्या अभियानात 
 नवीन मतदार नोंदणी
१८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींसाठी नवीन मतदार नोंदणी.
 रेशन कार्ड e-KYC
शिधा लाभ सुरळीतपणे मिळण्यासाठी रेशन कार्ड e-KYC.
 आयुष्मान कार्ड
पात्र लाभार्थ्यांसाठी ₹५ लाखांपर्यंत आरोग्य उपचाराचा लाभ होतो असे सहायता वेल्फेअर फाउंडेशनने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages