विद्यार्थ्यांनी एकाग्रता व निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी बुद्धिबळ खेळास प्राधान्य द्यावे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 21, 2026

विद्यार्थ्यांनी एकाग्रता व निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी बुद्धिबळ खेळास प्राधान्य द्यावे

विद्यार्थ्यांनी एकाग्रता व निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी बुद्धिबळ खेळास प्राधान्य द्यावे




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-   बुद्धिबळ खेळामधून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, एकाग्रता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित होते.   त्यामुळे खेळाडूमध्ये संयम, दूरदृष्टी, नियोजन आणि समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण  होते. म्हणून विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ खेळास प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी व्यक्त केले.


महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या कै.पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात तालुका क्रीडा समितीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, उद्योजक विलास कोरे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.


मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, बुद्धिबळ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे,  बुद्धिबळ खेळ ‘विचार करून निर्णय घेणे, परिणामांचा अंदाज घेणे आणि अडचणींवर शांतपणे उपाय शोधणे’ शिकवतो. म्हणूनच बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नसून बौद्धिक विकास आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी साधन आहे.

प्रारंभी शारीरिक शिक्षक क्रीडा महासंघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल कल्याणशेट्टी प्रशालेतील क्रीडा शिक्षक कुमार जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक बाबुराव पवार यांनी केले. सूत्रसंचलन नागराज कलबुर्गी यांनी केले तर आभार दत्तात्रय हिळळी यांनी मानले.  यशस्वीतेसाठी अविनाश राठोड, सोनल जाजू, सर्जेराव माशाळे, रवींद्र इंगळे, ज्योती नवले, दत्तात्रय धानोरे यांनी प्रयत्न केले.

चौकटीतील मजकूर

1बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास

बुद्धिबळ हा जगातील सर्वात लोकप्रिय  खेळ असून त्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, तर्कशक्ती, एकाग्रता विकसित होते. त्यांचा सर्वांगीण विकास होतो म्हणून तालुका क्रीडा समितीने बुद्धिबळास प्राधान्य दिले आहे असे मत समितीचे प्रमुख बाबुराव पवार यांनी व्यक्त केले.


2बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 300 विद्यार्थ्यांचा सहभाग 

अक्कलकोट तालुका क्रीडा समितीने आयोजित केलेल्या पावसाळी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages