वित्तीय संस्थांच्या हितासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक - चेअरमन अनिलकुमार अनभुले
माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या स्पर्धात्मक युगात वित्तीय संस्था पारदर्शकपणे व सभासदांच्या विश्वासास पात्र राहून चालविणे आवश्यक आहे. कर्ज मागताना असलेली अनेक कर्जदारांची मानसिकता कर्ज भरताना राहत नाही त्यामुळे कार्यकारी मंडळ व कर्मचाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून संस्थेच्या हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. वेळेवर कर्जवसुली झाली तरच वित्तीय संस्थांची प्रगती होते अन्यथा अनेक वित्तीय संस्था डबघाईस येतात तेंव्हा सर्वांनी ही संस्था माझी आहे या भावनेतून सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक-चेअरमन अनिलकुमार अनभुले यांनी केले.
ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रास्ताविक आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.
पतसंस्थेचे सचिव सुशेन भांगे यांनी अहवाल वाचन केले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवोदय विद्यालय व सैनिकी स्कूलसाठी निवड झालेले, गुणवत्ता शिष्यवृत्ती, मंथन,एटीएस आदी स्पर्धा परीक्षेतील 16 यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस वितरण करून सत्कार केला. रामकृष्ण जाधव यांना आरोग्य सेवक पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा पतसंस्थेचे वतीने चेअरमन अनिलकुमार अनभुले व सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,बँक इन्स्पेक्टर नारायण खांडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे अनिलकुमार अनभुले यांनी सांगितले की, सध्या पतसंस्थेकडे 11 कोटी 22 लाख रुपयांच्या ठेवी असून मागील आर्थिक वर्षात संस्थेला 9 लाखांहून अधिक नफा झाला आहे. भविष्यात एनपीएचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.कर्जदारांनी वेळेवर हप्ते भरुन सहकार्य करावे असे आवाहन करीत त्यांनी पात्र सभासदांना संस्थेच्या वतीने 10 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचेही सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, नारायण खांडेकर,अशोक गव्हाणे,भिमराव शिंगाडे, मुख्याध्यापक सौदागर गव्हाणे,कांतीलाल मुळे, भिमराव गुंड,बालाजी गव्हाणे,रामदास कोकाटे, दत्तात्रय खैरे,अविनाश माने, भारत कदम,दिपक गव्हाणे, अंकुश डूचाळ,गणेश गुंड, समाधान कोकाटे,सतीश गुंड,धनाजी सस्ते,भिवाजी जाधव,रामकृष्ण जाधव, शिवाजी कोकाटे,कुबेर पालकर,शिवाजी जाधव, अशोक कदम,ज्ञानेश्वर शेंडगे, राहुल जाधव,दिनकर कदम,भिमराव नागटिळक, युवराज शेगर,मधूकर कदम, अंकुश नागटिळक,अशोक जाधव,आदिनाथ शेगर यांच्यासह ग्रामस्थ,सभासद व विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.आभार सचिव सुशेन भांगे यांनी मानले.

No comments:
Post a Comment