सहकार महर्षि साखर कारखान्यास ऊस विकासाकरिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2026

सहकार महर्षि साखर कारखान्यास ऊस विकासाकरिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

सहकार महर्षि साखर कारखान्यास ऊस विकासाकरिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर


 
अकलूज (कटूसत्य वृत्त):-   महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि.शंकरनगर या कारखान्यास नॅशनल फेडरेशन को ऑप. शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेकडून गाळप हंगाम २०२५-२०२६ साठी ऊस विकासाकरिता उच्च उतारा विभागामध्ये तृतीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार जाहीर झाला आहे.
             सहकार महर्षि सहकारी साखर कारखान्यास यापूर्वीही विविध उल्लेखणीय कामे व प्राविण्याकरिता राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.नॅशनल फेडरेशन को ऑप.शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सदर पुरस्काराची घोषणा केलेली आहे. मंगळवार दि.२२ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे सकाळी ११.३० वा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान व केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे.
             कारखान्याचे मार्गदर्शक संचालक,महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगती पथावर चालू आहे.स.म.शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये ९६ दिवसात ७,६८,४७० मे. टन ऊसाचे गाळप करुन १०.९७ टक्के साखर उतारा मिळवून ७,२७,७७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून सरासरी ऊसाचे उत्पादन एकरी ४५ मे.टन इतके मिळाले. गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये कारखान्याने प्रतिदिनी सरासरी ८००० मे.टन ऊसाचे गाळप केले. यासोबत डिस्टीलरी, को-जन व ॲसेटीक ॲसिड इत्यादी उपपदार्थ उत्पादने ही घेतलेली आहेत.कारखाना शेती ऊस विकास विभागाच्या माध्यमातून अनेक ऊस विकास योजना राबविल्या जात आहेत.ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना कारखान्याच्या माध्यमातून सोयी सवलतीचा लाभ ना-नफा, ना तोटा या तत्त्वावर देणेत येतो. ऊस उत्पादक यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणेसाठी सेंद्रिय व जिवाणू खते वितरण तसेच वेळोवेळी मार्गदर्शनासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात असतात.
             सदरचा पुरस्कार प्राप्त झालेबद्दल कारखाना सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व व्यवस्थापन या सर्वामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages