महाराष्ट्रातील कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांचा कर्नाटकात गौरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

महाराष्ट्रातील कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांचा कर्नाटकात गौरव

 महाराष्ट्रातील कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांचा कर्नाटकात गौरव




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील कंत्राटदार व ट्रेडर्स यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 'महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ', 'राज्य अभियंता संघटना', 'महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना' व 'महाराष्ट्र राज्य कन्स्ट्रक्शन फोरम'चे राज्य अध्यक्ष मा. मिलिंद भोसले यांचा कर्नाटक स्टेट कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने विजापूर येथे यथोचित सत्कार करण्यात आला.
या वेळी त्यांना जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आणि भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी कर्नाटक स्टेट कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष मा. आर. मंजुनाथ, महासचिव मा. एच. आर. चिचळी, विजापूर जिल्हाध्यक्ष मा. सी. आर. रूडगी, माजी जिल्हाध्यक्ष मा. एस. मठ आणि प्रसिद्ध उद्योजक शिवानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
३८ हजार कोटींच्या प्रलंबित बिलांवर खलबते
सत्कार समारंभासोबतच कर्नाटकातील विविध शासकीय विभागांकडे कंत्राटदारांची अडकलेली तब्बल ३८ हजार कोटी रुपयांची देयके मिळवण्याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. कंत्राटदार आणि ट्रेडर्सच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कर्नाटक सरकारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना (PWD Minister) सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
भव्य 'कंत्राटदार भवना'चा भूमिपूजन सोहळा
या दौऱ्यादरम्यान विजापूर येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित भव्य अशा "कंत्राटदार भवन" इमारतीचा पायाभरणी (भूमिपूजन) समारंभ रविवारी संबंधित मंत्रीमहोदय व स्थानिक आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages