क्षयरुग्णांच्या उपचारासोबत पोषणाचीही साथ द्या!” - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

क्षयरुग्णांच्या उपचारासोबत पोषणाचीही साथ द्या!”

क्षयरुग्णांच्या उपचारासोबत पोषणाचीही साथ द्या!”
डॉ.मोहन शेगर जिल्हा क्षयरोग अधिकारी यांचे आवाहन



सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- क्षयरुग्णांना उपचारासोबत सकस व पौष्टिक आहार मिळावा.यासाठी अश्विनी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल च्या वतीने उपचाराधीन ५० क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहाराच्या फूड बास्केटचे वाटप डॉ.उत्तम कांबळे वैद्यकिय अधिकारी सहसंचालक कृष्ठ व क्षय पुणे यांच्या हस्ते या फूड बास्केटचे वाटप करण्यात आले.
क्षयरोगाच्या उपचारामध्ये नियमित औषधोपचारासोबत पौष्टिक आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन अश्विनी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला आहे. उपचाराधीन ५० क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना आवश्यक पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यावेळी डॉ.सुहास कुलकर्णी अधिष्ठाता अश्विनी मेडिकल कॉलेज यांनी क्षयरुग्णांना उपचाराच्या काळात पोषण आहार मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, उद्योजक आणि विविध संस्थांनी पुढे येऊन उपचाराधीन क्षयरुग्णांना दत्तक घ्यावे व त्यांना फूड बास्केटच्या माध्यमातून पोषणाची साथ द्यावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मोहन शेगर,डॉ.करजखेडे वैद्यकिय अधिक्षक अश्विनी मेडिकल कॉलेज, डॉ.प्रताप चौरे टी.बी.विभाग प्रमुख अश्विनी मेडिकल कॉलेज, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद अभिवंत, वैद्यकिय अधिकारी डॉ.सरोजा बनसोडे,प्रमोद अनटद,राजेंद्र पतंगे, विजय शेगर, राजकिरण भुताळे,सचिन भंडारे,सोमनाथ गायकवाड, युसूफ चौधरी,अमोल मोरे,मुकुंद कदम तसेच सर्व विभाग प्रमुख,कर्मचारी वर्ग व क्षयरूग्ण आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages