सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करा' - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 23, 2026

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करा'

 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करा' 

राजन पाटील यांचे आवाहन, विरोधकांची भूमिका काय?





सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी आमदार आणि सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी विरोधकांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलंय.

राज्यात सध्या दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकविचाराने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, असं राजन पाटील (Rajan Patil) यावेळी म्हणाले. दरम्यान, भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या या आवाहनाला विरोधकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजन पाटील यांचे विरोधकांना आवाहन

जवळपास 10 वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर येत्या महिन्याभरात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह इतर पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकीची ही रणधुमाळी सुरु असतानाच भाजपकडून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. भाजप नेते आणि सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी विरोधकांना निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आवाहन केलं आहे.

राजन पाटील विरोधकांना आवाहन करत म्हणाले की, 'राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करा. सोलापूर बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मानस आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी घालून दिलेली बिनविरोधाची परंपरा पुढच्या पिढीतील नेत्यांनीही आत्मसात करावी अशी आमची इच्छा आहे', असं मत भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केलंय . भाजप नेते राजन पाटील यांनी केलेल्या आवाहनाला विरोधकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages