शिक्षक मतदार संघासाठी मंगेश चिवटे यांनाच महायुतीची उमेदवारी द्यावी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 4, 2026

शिक्षक मतदार संघासाठी मंगेश चिवटे यांनाच महायुतीची उमेदवारी द्यावी

 शिक्षक मतदार संघासाठी मंगेश चिवटे यांनाच महायुतीची उमेदवारी द्यावी

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेची मागणी





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीने मंगेश चिवटे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 
         मंगेश चिवटे हे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याने पुणे विभागातील शिक्षकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण असल्याचे आडसूळ यांनी सांगितले.
        जुनी पेन्शन योजना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, अनुदानित शाळांच्या समस्या, वेतन व सेवाविषयक प्रश्न, शिक्षकांची सुरक्षितता तसेच शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक मुद्द्यांवर सक्षमपणे आवाज उठविणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील विविध शिक्षक व कर्मचारी संघटना, पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून चिवटे यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता आणि हक्कांसाठी संघर्षाची भूमिका यामुळे चिवटे हे सक्षम उमेदवार असल्याचे सांगत महायुतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन उमेदवारी द्यावी, अशी मागणी आडसूळ यांनी केली.
     या पत्रकार परिषदेस वैभव शेटे , जुबेर हिप्परगी, उमेश कल्याणी, रतिलाल डोंगरे , एजाज शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages