पेनुरचे श्रीकांत माने यांची वाहतूक नियंत्रकपदी पदोन्नती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 4, 2026

पेनुरचे श्रीकांत माने यांची वाहतूक नियंत्रकपदी पदोन्नती

 पेनुरचे श्रीकांत माने यांची वाहतूक नियंत्रकपदी पदोन्नती







मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पेनुर (ता. मोहोळ) येथील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) गेल्या २६ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे श्रीकांत माने यांची पंढरपूर आगारात वाहतूक नियंत्रक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पेनुर ग्रामस्थ, मित्रपरिवार व हितचिंतकांच्या वतीने जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला.

श्रीकांत माने यांनी आपल्या सेवाकाळाची सुरुवात वाहक म्हणून केली. गेल्या २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह सेवा देण्यासाठी योगदान दिले. दीर्घ सेवेनंतर त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना वाहतूक नियंत्रक या जबाबदारीच्या पदावर पदोन्नती मिळाली आहे. पंढरपूर येथे नवीन जबाबदारी स्वीकारताना त्यांच्या अनुभवाचा निश्चितच महामंडळाला फायदा होणार असून वाहतूक व्यवस्थापन अधिक सुरळीत करण्यासाठी ते योगदान देतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

दरम्यान पदोन्नती निमित्त भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष रमेश माने व युवा उद्योजक सागर चवरे यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी युवा नेते रणजीत चवरे, भैरवनाथ चवरे, कैलास माने, तानाजी सावंत आदीसह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages