तरूणांनी नोकररीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा- शिवतेजसिंह मोहिते-पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 4, 2026

तरूणांनी नोकररीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा- शिवतेजसिंह मोहिते-पाटील

 तरूणांनी नोकररीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा- शिवतेजसिंह मोहिते-पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यात फोटोग्राफी बरोबर पत्रकारीता क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणजे अकलूज येथील लोहकरे यांचे फोटो अँड व्हिडीओचे संपुर्ण जिल्हात वृत्तपत्राच्या माध्यमातून सुप्रसिद्ध नाव आहे.या परिवारातील तिसरी पिढी आज या व्यवसायाच्या अधुनिक फोटोग्राफी क्षेत्रात उतरली आहे.आज येथे भव्य ऑफिसचा शुभारंभ करण्यात आला.
               सोलापूर येथील विविध दैनिक वृत्तपत्रातून रंगीत छायाचित्र प्रसिद्ध करून कमी कालावधीत नाव करणारे कै. शरदराव लोहकरे,संजय शरदराव लोहकरे,राजीव शरदराव लोहकरे आणि आता केदार संजय लोहकरे यांनी अकलूजमध्ये कमी कालावधीत नावलौकिक मिळवला आहे.बातम्या आणि लोहकरे यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे.नव्याने सुरू केलेल्या केदार लोहकरे फोटो ॲन्ड फिल्मस् चे उद्घाटन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील व सुप्रसिद्ध ह्दयरोगतज्ञ डाॅ.एम.के.इनामदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील,सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे, पत्रकार चंद्रकांत कुंभार,भारत मगर,लक्ष्मीकांत कुरूडकर, नौशाद मुलाणी, तुकाराम उबाळे (मास्तर),अकलूज शहर फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ माने,उपाध्यक्ष कादर शेख,रणजीत एकतपुरे,शुकूर तांबोळी,जमीर तांबोळी व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages