रेणुका पतसंस्थेची कार्यक्षमता व पारदर्शकता असल्याने संस्था प्रगतीपथावर : मा.आ.राम सातपुते
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- संस्था स्थापन करणे सोपे आहे परंतु ती टिकवणे खूप कठीण आहे. माळशिरस तालुक्यात अनेक संस्था आल्या सभासदांना घेऊन बुडाल्या परंतु सभासदांनी रेणुका पतसंस्थेवर विश्वास ठेवल्याने गेले ४२ वर्ष पतसंस्थेची कार्यक्षमता व पारदर्शकता असल्याने रेणुका पतसंस्था प्रगतीपथावर असल्याचे मत मा.आ. राम सातपुते यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथे घेण्यात आलेल्या रेणुका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, रेणुका महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, हर हर महादेव ग्रामीण बिगर शेती पतसंस्था व समाजभूषण नानासाहेब देशमुख विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते. ते पुढे बोलत असताना म्हणाले की, बाबाराजे देशमुख यांना सहकाराचा वारसा समाज भूषण नानासाहेब देशमुख यांच्यापासून आहे. नातेपुते गावाची वेगळी संस्कृती असून हे गाव सर्व समाजाला, गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारे गाव आहे.ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येणारी पिढी चांगली काम करते आहे. मागील ५ वर्षात ३५ कोठी निधी नातेपुते गावासाठी आणून गावचा विकास केला असल्याचे मत मा.आ. राम सातपुते यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास मा. आ.राम सातपुते, मा.आ.रामहरी रुपनवर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा पतसंस्थेचे चेअरमन बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मामासाहेब पांढरे, महेश शेटे, अँड. डी. एन. काळे, डॉ.एम.पी.मोरे,अँड. शिवाजीराव पिसाळ,अँड.बी.वाय.राऊत, मा.पं.स. सदस्य माऊली पाटील, हनुमान धालपे,बाहुबली चंकेश्वरा, अतुल बावकर, गणेश उराडे, नाथाजीराव देशमुख, अमरशील देशमुख, हेमंत देशमुख, भैय्यासाहेब देशमुख, मालोजीराजे देशमुख, धनाजीराव देशमुख, रणवीर देशमुख, महिला पतसंस्थेच्या चेअरमन सुचित्रादेवी देशमुख, श्रुतिका देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. चार संस्थेचे सचिव उमेश कुचेकर, अशोक कुचेकर, उमेश पोतदार, बापूराव पाटील यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते समाजभूषण नानासाहेब देशमुख लखपती योजना व सोनेतारण कर्ज व आवर्तक ठेव योजनेचे उद्घाटन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार घेण्यात आले. संचालक मालोदर्जा देशमुख प्रास्ताविक करत असताना म्हणाले की, समाजभूषण नानासाहेब देशमुख यांनी १४ जानेवारी १९८६ साली पतसंस्थेची स्थापना केली. पतसंस्थेला ४६ वर्ष पूर्ण झाले असून अनेक सुशिक्षित बेरोजगार गरजू नागरिकांना व्यावसायिकासाठी कर्ज पुरवठा केल्याने हजारो कुटुंब अनेकांचे संसार पतसंस्थेच्या माध्यमातून उभा राहिली व त्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे मत मालोजीराजे देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी रेणुका परिवारावर प्रेम करणारे सर्व नागरिक, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक, अनेक पतसंस्थांचे चेअरमन, वरील सर्व संस्थांचे पदाधिकारी, पिग्मी एजंट, सभासद, कर्जदार, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकटीत :
सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या सहकार्याने पतसंस्थेची यशस्वी वाटचाल असून सभासद संख्या ११८६ झाली आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानूनच पतसंस्थेचे काम. भाग भांडवल २ कोटी ६३ लाख, ठेवी ६४ कोटी ४३ लाख असून व्यापारी वर्गाचा विश्वास असल्याने ठेवी मध्ये सातत्याने वाढ होत असून ३ कोटी ८५ लाख कर्ज वाटप केले असून २६ कोटीची गुंतवणूक तर रेणुका पतसंस्थेची ३३ कोठीची वार्षिक उलाढाल असून ४.५० कोटी नफा झाला आहे पतसंस्थेचे पदाधिकारी संचालक मंडळ हे पारदर्शकता ठेवून काम करत आहेत.
बाबाराजे देशमुख
सोलापूर जि.प.चे.मा. उपाध्यक्ष तथा पतसंस्थेचे चेअरमन


No comments:
Post a Comment