कोर्टी येथे प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

कोर्टी येथे प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 कोर्टी येथे प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 




पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे, विधान परिषद सदस्य प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी कोर्टी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगण मध्ये वृक्षारोपण व शाळेतील सर्व मुला मुलींना वही पेन व खाऊ वाटप करण्यात आले, जनतेसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणजे प्रशांतराव परिचारक आहेत त्यांच्या वाढदिवस समाज उपयोगी व समाजातील दुर्बल घटकासाठी मदत झाली पाहिजे, होतकर वगरीब विद्यार्थ्यांना, वही पेन खाऊ वाटप करण्यात आले, तसेच गावातील तरुण मुलांनी सामाजिक बांधिलकी जपत व हार फेटे व फटाक्याची अतिश बाजी न करता वृक्षारोपण व हासामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत, प्रशांतराव परिचारक मालकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला 

यावेळी पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्यांचे संचालक भैरू माळी, मा, पंचायत समिती उपसभापती अरुण घोलप, मा, सरपंच रघु पवार ,उपसरपंच मुन्ना शेख, द्रोणाचार्य हाके, मा,संचालक गणपत लवटे शाळेचे मुख्याध्यापक बापू मिसाळ सर ग्रामपंचायत सदस्य राजू शेंबडे, सत्यवान मस्के, पोपटहाके मा,उपसरपंच दादा लवटे मा,उपसरपंच महेश येडगे राजाराम माळी, तात्यासो कारंडे राजू बाक्षर मुलानी, अमोल बनसोडे नाथा बाबर दत्ता ओव्हाळ तुकाराम बाबर सुरेश लवटे, दिनेश चव्हाण इत्यादी मान्यवर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages