विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा, शिस्त आणि सातत्य हाच यशाचा खरा मार्ग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा, शिस्त आणि सातत्य हाच यशाचा खरा मार्ग

 विद्यार्थ्यांसाठी प्रेरणाशिस्त आणि सातत्य हाच यशाचा खरा मार्ग

                                    - सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे 



 

          पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-    विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यश संपादन करण्यासाठी प्रेरणा, शिस्त आणि सातत्य या तीन सूत्रांचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. हे तीन अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत. प्रेरणा तुम्हाला कामाची सुरुवात करण्यास मदत करतेशिस्त तुम्हाला योग्य मार्गावर ठेवते आणि सातत्य तुम्हाला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवते असे प्रतिपादन सहा पोलीस  अधिक्षक प्रशांत डगळे यांनी केले. 

         गणेशोत्सवानिमित्त आयोजित लोकसंवाद 2026 उपक्रमांतर्गत चिंचणी (ता.पंढरपूर)  येथील वरदायिनी गणेशोत्सव मंडळ येथे शासनाकडून विद्यार्थ्यांना प्राथमिक  शिक्षणापासून ते उच्च  शिक्षणापर्यंत उपलब्ध  करुन देण्यात आलेल्या सुविधाबाबत श्री. डगळे यांनी संवाद साधला

             यावेळी सहा. पोलीस  अधिक्षक डगळे म्हणाले,  आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसूनया तीन स्तंभांच्या बळावरच विद्यार्थी आपले ध्येय साध्य करू शकतातप्रेरणा ही विद्यार्थ्याला एखाद्या कामाची किंवा अभ्यासाची सुरुवात करण्यास मदत करते. ती अंतःकरणातून येणे गरजेचे आहे. मात्रकेवळ प्रेरणेवर विसंबून चालत नाहीत्यासाठी शिस्तीची जोड असावी लागते. शिस्त विद्यार्थ्याला योग्य मार्गावर ठेवतेवेळेचे नियोजन शिकवते आणि अभ्यासातील लक्ष विचलित होऊ देत नाही. प्रेरणेने सुरू केलेले काम शिस्तीने पुढे नेले तरीही अंतिम यशासाठी सातत्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. सातत्यच विद्यार्थ्याला त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवते.विद्यार्थ्यांनी केवळ गुणांमागे न धावता या तीन मूल्यांना आपल्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा बनवावेजेणेकरून ते एक आदर्श आणि यशस्वी नागरिक बनू शकतीलअसा संदेश या प्रसंगी देण्यात आला.

              तसेच चिंचणी या पुर्नवसीत गावातील नागरिकांनी गावाच्या विकासात्मक कामात सातत्य राखल्याने याठिकाणच्या  नागरिकांना ‍   तसेच बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. चिंचणी गावाने केलेल्या विकासामुळे राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त झाले असल्याचे गौरवोध्दार देखील त्यांनी काढले.

          यावेळी कार्यक्रमास  मोहन अनपट,शशिकांत सावंत, चंद्रकांत पवार, शरद सावंत तसेच चिंचणी ग्रामस्थ व विद्यार्थि उपस्‍थित होते.  


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages