अफवांना पूर्णविराम; पंचायत समिती सदस्य आमदार राजाभाऊ खरे यांच्या सोबतच
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पंचायत समिती सदस्यांनीच आमदार राजाभाऊ खरे यांची भेट घेऊन पूर्णविराम दिला .
मोहोळ विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दशकांपासून रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळत असून विविध गावांतील रस्ते, पाणी, वीज, वाहतूक, शेती, शिक्षण तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लागत आहेत.अडले नडलेल्याना प्रतेक्ष्य ठोस आणि भर भक्कम मदत मिळत आहे.
विकासकामांना मिळत असलेली गती पाहता काही विरोधकांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत काही पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा करण्यात आल्या आहेत.
मात्र, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर संबंधित पंचायत समिती सदस्यांनी स्वतः आमदार राजाभाऊ खरे यांची भेट घेतली. यावेळी “आम्ही आपल्या सोबत आहोत आणि आपल्या सोबतच राहणार आहोत,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
आमदार खरे यांच्या म्हणण्यानुसार, या भेटीदरम्यान पंचायत समिती सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत एकजुटीने काम करण्याचा विश्वास दिला. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांपेक्षा संबंधित सदस्यांनी प्रत्यक्ष भेटीत व्यक्त केलेली भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार राजाभाऊ खरे यांची भेट घेणाऱ्या पंचायत समिती सदस्यांमध्ये बाळासाहेब गायकवाड (पंचायत समिती सदस्य सय्यद वरवडे), धनाजी माळी (पंचायत समिती सदस्य कुरुल ), डॉ. अमित व्यवहारे (पंचायत समिती सदस्य आष्टी), गणेश मूळे (पंचायत समिती सदस्य खंडाळी), सौ. संगीता वसेकर (पंचायत समिती सदस्य पेनूर) आणि प्रथमेश संजय वसेकर संगीता वसेकर यांचे चिरंजीव यांचा समावेश आहे
दरम्यान, “राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत राहतात; मात्र मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे,” अशी भूमिका आमदार राजाभाऊ खरे यांची आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर राहणार असून अफवा आणि चर्चांपेक्षा प्रत्यक्ष विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असेही आमदार खरे यांची भूमिका आहे.

No comments:
Post a Comment