दुचाकी वाहनांसाठी MH 13-FF नवीन मालिका सुरु
अर्जासोबत केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहीत केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल (उदा. आधार कार्ड, टेलिफोन बील इ.) एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 05.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शविलेल्या दिवशी (दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 02.00 वाजेपर्यंत) सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला डीडी रुपये 300/- पेक्षा कमी रकमेचा नसावा. सदर डीडी फक्त "Dy R.T.O. Solapur "यांच्या नावे नॅशनलाईज शेडयुल्ड बँकेंचा असावा, या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील. डीडी कमीत कमी एक महिना मुदतीमध्ये असावा. दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 04.00 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडुन ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल, कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, वाहन धारकाने एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयात डी.डी. जमा केल्यास सदर बाबीस कार्यालय जबाबदार राहणार नाही.
नवीन दुचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक (MH 13-FF)
* दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी तिप्पट शुल्कचे अर्ज व दुचाकी वाहनांसाठी नियमित अर्ज वेळ सकाळी 11 ते
4 या वेळेत स्विकारले जातील.
* दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता यादी जाहीर केली जाईल.
* दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डीडी स्वीकारले जातील.
त्यासाठी रक्कम रुपये 300 पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे.
* दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी व परिवहन संवर्ग वाहनांसाठी
आलेल्या डबल अर्जाचा लिलाव दुपारी 04.00 वाजता.
No comments:
Post a Comment