सोलापूर शहरात ८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट मनाई आदेश लागू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

सोलापूर शहरात ८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट मनाई आदेश लागू

सोलापूर शहरात ८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट मनाई आदेश लागू

शस्त्रे, स्फोटके, पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास बंदी

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत दि. ८ ऑगस्ट २०२६  रोजी ००.०१ वाजेपासून ते २२ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री २४.०० वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) व (२) अन्वये हा आदेश जारी केला आहे.
काय बाळगण्यास प्रतिबंध?
या कालावधीत शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, विना परवाना बंदुका, चाकू, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई आहे. परवानाधारक बंदुकीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याची विशिष्ट परवानगी घेतल्यासच सूट राहील.
तसेच कोणताही स्फोटक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रे, ती फेकण्याची उपकरणे वाहून नेणे, गोळा करणे व तयार करणे, व्यक्ती-प्रेत-आकृती-पुतळ्यांचे प्रदर्शन, सार्वजनिक ठिकाणी टीका करणारे उच्चार, गाणी, संगीत वाजवणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
शालीनता किंवा शिष्टाचाराला बाधा आणणारी चित्रे, चिन्हे, फलक, वस्तू तयार करणे, प्रदर्शित करणे किंवा प्रसारित करणे, ज्यामुळे सामाजिक नैतिकता, सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्यव्यवस्थेविरुद्ध वातावरण निर्माण होईल, अशा कृतींनाही प्रतिबंध करण्यात आला आहे.
उल्लंघन केल्यास कारवाई
प्रतिबंधित वस्तूंसह आढळल्यास कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यामार्फत संबंधित व्यक्तीस निःशस्त्र केले जाईल. जप्त केलेली शस्त्रे, स्फोटके, क्षेपणास्त्रे राज्य सरकारकडे जमा करण्यात येतील.
कोणाला सूट
1. सरकारी/निमसरकारी सेवेत असलेल्या व कर्तव्यासाठी शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना.
2. खाजगी सुरक्षा रक्षक, गुरखा, चौकीदार यांना ३.५ फूट लांबीपर्यंतची लाठी बाळगण्यास परवानगी.
पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावावर बंदी
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) नुसार याच १५ दिवसांच्या कालावधीत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास, मिरवणुकीस, तसेच मिरवणुकीत लाऊडस्पिकर, वाद्य, बँड व फटाके वाजवण्यास मनाई आहे.
खालील बाबींना सूट :
* विवाह समारंभ, अंत्यसंस्कार
* सहकारी संस्था, कंपन्या, क्लब, संघटनांच्या कायदेशीर बैठका
* चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी प्रेक्षकांचे संमेलन
* सरकारी/निमसरकारी कार्यालये, न्यायालये येथील शासकीय कामकाजासाठीचे संमेलन
* शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक उपक्रम
* कारखाने, दुकाने, आस्थापनांमधील सामान्य व्यापार-व्यवसायासाठीचे संमेलन
* विभागीय पोलीस उप आयुक्त किंवा पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेले संमेलन/मिरवणुका


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages