नातेपुते महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने बुधवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी .एस साळुंखे यांच्या हस्ते भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ .एस. आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रंथालयात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये पुस्तके वाचण्याची आणि समजून घेण्याची गोडी निर्माण होते. ग्रंथालयातील शांत वातावरणामुळे मनाला शांती मिळते आणि अभ्यासाची व संशोधनाची एकाग्रता वाढते तसेच वेगवेगळ्या विचारांच्या पुस्तकामुळे माणसांची विचार करण्याची क्षमता आणि कल्पकता प्रगल्भ होत असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस साळुंखे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाचे ग्रंथपाल प्रा.दिलीप शिंदे, वरिष्ठ लिपिक एच. टी. वाघमोडे, नागराज करपे, संध्या सूर्यवंशी, तसेच महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र साठे, प्रा. सी.एम .साळुंखे, प्रा. दीपिका मसुगडे, प्रा. नागेश जाधव, प्रा. अनिल गेमाड, प्रा. डॉ. सतीश पाटील, प्रतीक्षा मदने, मोनिका देशमाने, शिक्षकेत्तर कर्मचारी सुधाकर काळे, विलास जावीर, यश पदमन व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. दिलीप शिंदे यांनी केले आभार प्रा.डॉ.कमल कांबळे यांनी मानले.

No comments:
Post a Comment