लोककेंद्रित विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी अशा प्रशिक्षणांची मोठी भूमिका- संस्कृती सातपुते
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची फळे अधिक परिणामकारकपणे पोहोचावीत, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढावी आणि विकास प्रक्रियेत लोकसहभाग अधिक दृढ व्हावा यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी, उपलब्ध निधीचे सुयोग्य नियोजन, पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन आणि लोककेंद्रित विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी अशा प्रशिक्षणांची मोठी भूमिका असल्याचा विश्वास सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी व्यक्त केला.
त्या १६ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सोलापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम, स्वावलंबी, उत्तरदायी आणि विकेंद्रित नियोजनक्षम बनविण्याच्या उद्देशाने आयोजित सर्व जिल्हा परिषद सदस्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment