कल्याणशेट्टी प्रशालेतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 7, 2026

कल्याणशेट्टी प्रशालेतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

 कल्याणशेट्टी प्रशालेतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा असोशिएशनच्या वतीने रविवार दि 02/08/2026 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड स्पर्धेत सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुमार सिद्धाराम भोजण्णा जमादार हा विद्यार्थी 14 वर्षाखालील वयोगटातून 60 मीटर धावणे, लांब उडी या दोन्ही स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक तसेच बॉक श्रो (गोळा फेक) स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे, आता दि. 27 ते 30 ऑगस्ट 2026 या दरम्यान होणाऱ्या डेवरण, जि.रत्नागिरी येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यास क्रीडा शिक्षक कुमार जाधव व श्रीशैल किणग या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे
यशस्वी खेळाडू विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभागप्रमुख रूपाली शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages