जिल्हा परिषद शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 7, 2026

जिल्हा परिषद शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध

 जिल्हा परिषद शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेमधील 'शिवरत्न सभागृह' या सभागृहाचे नाव बदलण्याच्या ठरावास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे 'शिवरत्न' हे नाव कायम ठेवण्यात यावे, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.
 निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा देणारे 'शिवरत्न' हे नाव जिल्ह्याच्या अस्मितेशी जोडलेले आहे. त्यामुळे कोणताही राजकीय किंवा अन्य हेतू डोळ्यासमोर ठेवून या सभागृहाचे नाव बदलण्याचा निर्णय घेऊ नये.

 जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहचे नाव बदलण्याचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा. अन्यथा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, शहर सचिव विश्वजीत गंभीरे, शहर उपाध्यक्ष सनी पाटु, जिल्हा सचिव गुंडपा जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages