एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 7, 2026

एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन आमदार अभिजित पाटील यांचे ४३ व्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर संचलित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालय, वेणूनगर, पंढरपूर यांच्या वतीने "एकरी १०० टन ऊस उत्पादन" हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आधुनिक स उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दि. ०६ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीकृष्ण मंदिर, उपरी येथे करण्यात आले. या कार्यशाळेस परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बाबुराव तुकाराम नागणे (उपरी) (ज्येष्ठ सभासद, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना) यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यशाळेमध्ये डॉ. गणेश पवार यांनी आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञान, प्रा. हणमंत शिंदे यांनी माती परीक्षण व ऊस पिकातील खत व्यवस्थापन, तर प्राचार्य, डॉ. बालाजी घाडगे यांनी ऊस पिकातील रोग व किड व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञान, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, मृदा आरोग्य, रोग व किड नियंत्रण तसेच अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाबींची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, संभाजी भोसले, साहेबराव नागणे, धनंजय काळे, सीताराम गवळी, सुरेश भुसे, तसेच उपरी गावचे माजी उपसरपंच महेश नागणे, कैलास मुळे, वसंत नागणे, दत्तात्रय नागणे, श्रीराम नागणे, माणिक नागणे, भीमराव गव्हाणे, कांतीलाल पाटील, महादेव देठे, पंजाबराव पासले, ज्योतीराम देठे, मोहन देठे, नामदेव माने, बाळासाहेब बुरांडे, सुरेश घाटुळे, दादासाहेब बुरांडे, कारखान्याचे अधिकारी नितीन पवार, शाम शिंदे, उद्धव बागल, प्रा. मासाळ मॅडम, सतीश माने,सर्व चिटबॉय, अॅग्री ओव्हरशियर तसेच उपरी गाव व भाळवणी गटातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए. डी. वाघसाहेब (केन मॅनेजर) यांनी केले. सूत्रसंचालन नितीन पवार व प्रा. तृप्ती राठोड मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक दिनकर चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनांसाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सौ. प्रेमलता रांगे मॅडम,सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक दत्तात्रय गायकवाड, श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागाने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित शेतकऱ्यांनी आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक उत्पादन घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages