मनोरमा व मसाप'च्या 'गझलदीप' कार्यक्रमाला रसिकांनी दिली भरभरून दाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

मनोरमा व मसाप'च्या 'गझलदीप' कार्यक्रमाला रसिकांनी दिली भरभरून दाद

 मनोरमा व मसाप'च्या 'गझलदीप' कार्यक्रमाला रसिकांनी दिली भरभरून दाद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरसह महाराष्ट्रभरातील साहित्यिकांच्या लेखनीला प्रोत्साहित करण्यासह दर्जे दार आणि उत्तम साहित्य निर्मितीला जन्म घालण्यसाठी नेहमीच ऊर्जेचे बळ देणाऱ्या सोलापुरातील मनोरमा साहित्य मंडळी आणि मसाप शाखा पश्चिम सोलापूर यांच्यावतीने रविवारी आयोजित 'गझलदीप' कार्यक्रमाला सोलापुरी गझल रसिकांनी भरभरुन दाद दिली. सोलापुरात बाहेर पावसाच्या कोसळधारा आणि कार्यक्रमस्थळी सभागृहात गझलधारा बसरल्याचं चित्र बघायला मिळालं. गझलदीप कार्यक्रमातून सादर झालेल्या अनेक दर्जेदार, अभ्यासपूर्ण हिंदी, उर्दू, मराठी गझलांनी सोलापुरी गझल रसिक चिंबचिंब झाले.
मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे यांनी 'गझलदीप' कार्यक्रमाच्या दर्जे दार आणि नेटक्यापणाला चार चाँद लावले. कार्यक्रमाचे स्वागत ऋचा पाटील यांनी केले.
प्रास्ताविका शोभा मोरे यांनी गझलचे महत्त्व विषद केले. मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. यावेळी व्यासपीठावर दत्ता मुळे, दत्ता सुरवसे, संतोष सुरवसे, शिल्पा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. गझलकार प्रदीप निफाडकर म्हणाले की, ज्ञानेश्वर चक्रधर तुकाराम या महाराष्ट्रात होऊन गेले म्हणून आज महाराष्ट्राचा बिहार होऊ शकत नाही. कवींमुळे महाराष्ट्र घडला. कवी म्हणजे आपण सगळे आहोत. रसिक म्हणजे मुका कवी असतो तर कवी म्हणजे बोलका रसिक असतो अशी कवींची व्याख्या त्यांनी सांगितली. प्रदीप निफाडकर यांची मुलाखत शिल्पा देशपांडे यांनी घेतली. तर गझल गायन केतन गोडबोले यांनी केले. दर्शन बासुदकर यांनी संगीत साथ दिली. सूत्रसंचालन अभिराम सराफ यांनी केले.

चौकट-
साहित्याच्या सेवेसाठी मसापच्या विविध शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पद्माकर कुलकर्णी, जे. जे कुलकर्णी, श्रृती वडगबाळकर, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. नसीमा पठाण, कवी मारुती कटकधोंड, वजिद्दीमा बिराजदार, गोविंद काळे, राजेंद्र भोसले, वंदना कुलकर्णी मुबारक शेख, सुहाज पुजारी, कलिदास चवडेकर, नरेंद्र गुंडेली यांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages