डी वाय पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

डी वाय पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 डी वाय पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार




कोल्हापूर (कटूसत्य वृत्त):- डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सहकार आणि राजकारण क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे. बुधवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मोठी गर्दी केली होती. डॉ. पाटील यांचे पार्थिव कसबा बावडा येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. आज सकाळपासून अंत्यदर्शन घेण्यासाठी सामान्य नागरिकांपासून मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी डॉ. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या व्यापक सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याला आदरांजली वाहिली. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा विस्तार पोहोचवणारे डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात आणि देशाबाहेरही उच्च शिक्षणाचा भक्कम पाया रचला.

त्यांच्या जाण्याने राज्याने एक दूरगामी विचार करणारा मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज अंत्यदर्शन घेणाऱ्यांमध्ये खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, निवृत्त न्या. बी. जी.कोळसे पाटील, विधान परिषद माजी विरोधीपक्ष नेते आमदार अंबादास दानवे, तसेच अमित देशमुख, विश्वजीत कदम, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, शिवाजी पाटील, अशोक माने, हेमंत ओगले, यशोमती ठाकूर,आदी आमदार, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, कर्नाटकचे माजी मंत्री आर.एम. पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, राजेश कदम, लक्ष्मणराव चिंगळे, महापौर रूपाराणी निकम,कुलगुरू डॉ. रजनीश कामत,अभिनेते सयाजी शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुरुदीप सफल, प्रणव झा, बी एन संदीप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, आमदार विजय वडेट्टीवार, सचिन सावंत, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील आदींचा समावेश होता.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पश्चात पत्नी शांतादेवी पाटील, डी. वाय. पाटील संस्था समूहाचे प्रमुख संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, मुलगी भाग्यश्री पाटील, राजश्री काकडे, सुप्रिया चव्हाण पाटील, मुलगा विजय पाटील, अजिंक्य पाटील (मुंबई) आणि मुली नंदिता पानशेतकर, पूजा चोलेरा यांच्यासह मोठा परिवार आहे.

वारकरी संप्रदायातील कुटुंबात २२ ऑक्टोबर १९३५ रोजी डी. वाय. (ज्ञानदेव यशवंत) पाटील यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबातील मुलगा, आमदार ते राज्यपाल असाच त्यांचा प्रवास राहिला. सामाजिक, आध्यात्मिक, कला, सांस्कृतिक उपक्रमांना पाठबळ देणारा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages