सकल मराठा समाजाच्या वतीने नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

सकल मराठा समाजाच्या वतीने नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार

 सकल मराठा समाजाच्या वतीने नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव आमदार- सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष- मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आला. या बद्दल अक्कलकोट शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार सोहळा जुने तहसील कार्यालय, नेहरू गल्ली येथील आमदार कार्यालयात संपन्न झाला. जय भवानी...! जय शिवराय...! च्या जय घोषात आमदार कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता.

दरम्यान नगराध्यक्ष- मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष- ऋतुराज तथा बंटी राठोड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक येथे उभा राहवा या करिता गेल्या कांही वर्षापासून प्रयत्न करत असलेले समाज बांधव व नगरसेवक- तम्मा शेळके यांचा सत्कार सकल मराठा समाजाच्या वतीने मनाचा फेटा, शाल, पुष्प गुच्छ देऊन संपन्न झाला.

या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महराज देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे, अमर पाटील, बाळासाहेब घाटगे, प्रथमेश इंगळे, संजय मोरे, मनोज निकम, नगरसेवक अशोक जाधव, नन्नु कोरबू, नागराज कुंभार, सिद्धाराम टाके, अभिषेक लोकापुरे, नितीन मोरे, सौरभ मोरे, प्रवीण देशमुख, रोहित निंबाळकर, सुमित घाटगे, शीतल फुटाणे, अतिश पवार, प्रवीण घाटगे, निखील पाटील, वैभव मोरे, वरुण शेळके, सुहास सुरवसे, रवी पोळ, मंगेश सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी, प्रसाद मोरे, समर्थ घाटगे, प्रथमेश पवार, प्रदीप सलबत्ते, शिवबा जाधव, अण्णासाहेब सुरवसे, प्रदीप सुरवसे, विराज माणिकशेट्टी, भरत राजेगावकर, ज्ञानेश्वर भोसले, स्वामिनाथ बाबर, रोहन शिर्के, अॅड. फहीम पिरजादे, राजाराम पवार, अमित घाटगे, शुभम सावंत, शुभम चव्हाण, मुन्ना फडतरे, योगेश पवार, दिनेश बंडगर, तानाजी सूर्यवंशी, नितीन चव्हाण, विनोद पवार, राहुल काळे, गणेश मोरे, समर्थ जाधव, सुनिल मोरे, बालाजी पाटील, चंद्रकांत कुंभार, विशाल कलबुर्गी, राहुल शेळके, अनिल मोरे, पिंटू गायकवाड, बंडू इंगळे, रवी कोरे, बाळा पाटोळे, भिमा कोळी, तम्मा परीट, अनिल लोणारी, प्रशांत भगरे, राजू पवार, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, धनंजय निंबाळकर, समर्थ घाटगे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, रमेश शिंदे, गोविंदराव शिंदे, खंडेराया शिंदे, किरण साठे, राजेश इंगळे, स्वामिनाथ बेंद्रे, स्वामिनाथ चव्हाण, कुमार भिसे यांच्या सह अक्कलकोट शहर व तालुका सकल मराठा समाज आदिजण बहुसंख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होत आहे, या बाबत समाज बांधवातून समाधान व्यक्त होत असून, शिवरायांचा जय घोष अक्कलकोटचा अभिमान, आयरलाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभी राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस वंदन करत अक्कलकोटच्या भूमीवर स्वाभिमानाचा इतिहास पुन्हा उज्वल होणार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि स्वाभिमानाची ज्योत कायम पेटती राहो, छत्रपतींची प्रेरणा स्वाभिमानाची राजधानी श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये विकासाचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या बद्दल समाज बांधवाच्या वतीने या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या बाबतची सर्वती पुर्तता करण्यात आलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची आठवण सदैव जागवणारा हा निर्णय देशाच्या इतिहासात मानाचा ठरेल. या एैतिहासिक निर्णयाने तालुका व शहरवासीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages